कुमार नागे - लेख सूची

सांगली नास्तिक परिषद – का? व कशासाठी? 

ब्राईट्स सोसायटीतर्फे गेली १० वर्षे आपण अनेक उपक्रम राबवतो आहोत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून समाजाचे शैक्षणिक प्रबोधन करणे, बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिकांमध्ये साहचर्य, सुसंवाद निर्माण करणे, त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे इत्यादी उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी ब्राईट्स सोसायटीची स्थापना करण्यात आली. २०१४ पासून ब्राईट्स सोसायटीने सभा, नास्तिक संमेलने, भाषणे, चर्चासत्रे आणि चर्चा आयोजित केल्या आहेत. या उपक्रमांना उत्तम प्रतिसाद मिळतो. निमंत्रित वक्त्यांमध्ये समाजातील प्रभावशाली व्यक्तिमत्वे, शिक्षणतज्ज्ञ, कलाकार, लेखक, संपादक, …

नास्तिक तितुका मेळवावा, सर्वत्र विवेक वाढवावा

गेली दहा वर्षे मी ज्या दोन मुद्यांवरती बोलतो आहे. तेच दोन मुद्दे मला आणखी सविस्तर, वेगळ्या शैलीमध्ये मांडावे लागतील. एक, परिषदेसारखे हे सगळे उपद्व्याप कशासाठी? आणि दोन, परिषद सांगलीतंच का? तर हे जे दोन बेसिक मुद्दे आहेत त्याच्यावरती मी बोलणार आहे. आपण गेली दहा वर्षे वेगवेगळे उपक्रम करत आहोत. यावेळी आपला दशकपूर्ती समारंभ आहे. सामाजिक …

ज्योतिष: तिसऱ्या जगातील काल्पनिक गोंधळ

ज्योतिष : शास्त्र की थोतांड?“याचे स्पष्ट आणि निःसंदिग्ध उत्तर थोतांड हेच आहे.” ३ जुलै २०२१ ला साम टीव्ही मराठीवर मी चर्चेत सहभागी झालो होतो. वेळेच्या अभावी अनेक मुद्दे मांडायचे राहून गेले. त्यातील काही मुद्दे सविस्तरपणे मांडतो. प्रसारमाध्यमे असोत वा राजकारण, आपल्या देशात तार्किक आणि मुद्देसूद चर्चा करण्याचे अगदी तुरळक पर्याय आहेत. ‘आजचा सुधारक’ या विषयांवर विशेषांक प्रकशित करत आहे …

बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य : विचार आणि संघटन

बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य : जगाला प्रभावित करू शकणाऱ्या अलौकिक शक्तीचे, व्यक्तीचे वा वस्तूचे अस्तित्व बुद्धिगम्य नाही म्हणून ते स्पष्टपणे नाकारणे. परंतु ज्यावेळी आपण ‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’ ठळकपणे उद्धृत करत आहोत त्यावेळी अलौकिक शक्तीसहीत धर्म/पंथ/धम्म/दीन/रिलिजन (religion) अशा धर्माधीष्ठित जीवनपद्धतीसुद्धा नाकारत आहोत आणि म्हणूनच हिंदू-नास्तिक, मुस्लिम-नास्तिक, बौद्ध-नास्तिक, ख्रिश्चन-नास्तिक इत्यादी संभ्रमात टाकणारे शब्द आणि ‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’ ही संज्ञा यातील फरक …

प्रतिसाद

‘आसु’मधील दिवाकर मोहनी ह्यांचा ‘आमच्या देशाची स्थिती’ हा लेख वाचला. आमचे स्नेही प्रमोद सहस्रबुद्धे यांनी या लेखावर मोकळेपणाने चर्चा व्हावी आणि त्याबद्दलची प्रतिक्रिया पाठवावी असे आवाहन केले होते. अनेकवेळेला हा विषय वैचारिक चर्चेपेक्षा भावनिक अंगाने अधिक मांडला जातो म्हणून सर्वप्रथम श्री. मोहनी ह्यांनी केलेल्या ‘वैचारिक विवेचनाचे’मन:पूर्वक स्वागत. मी दोन टप्यांमध्ये या लेखावर प्रतिक्रिया देऊ इच्छितो. …